नागपुर समाचार : भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशन, नागपूरची तीसरी बैठक काल दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या पहिल्या माळ्याच्या हाॅलमध्ये संपन्न झाली. लागोपाठ एकाहून एक सरस अश्या या सभेला हाॅल मध्ये खच्च भरुन सलाहकार वेगळे काय या उत्सुकतेने ऊत्साहीत होते व पहिल्या, दुस-या मिटिंग मध्ये ज्या अपेक्षेने ते आले होते त्यात ब-याच नविन सलाहकारांनी देखिल चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी मंचावर संघटनेचे पी.आर.ओ. श्री. राजेश चौहान, कार्यकारी अध्यक्ष श्री. के. एम. सुरडकर, संस्थापक अध्यक्ष श्री राजविरसिंह व प्रमुख अतिथी म्हणून प्रेरणादायी स्पीकर श्री. कैलाश तानकर ऊपस्थित होते.
संस्थेचे पी.आर.ओ. श्री. राजेश चौहान सरांनी आपल्या ऊद्बोधनात सलाहकारांना भविष्यात मिळणाऱ्या वेल्फेअर संबंधी ऊद्बोधन केले. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. के. एम. सुरडकर यांनी आपल्या ऊद्बोधनात विजिट संबंधी, फाईनल डिल, कमीशन आदि. संबधी योग्य दस्तावेजीकरण करुन मार्केटिंग कंपन्या, विकासक, बिल्डर्स व सलाहकारांच्या हस्ताक्षराने या दोघांमध्ये पूराव्याच्या रुपात राहतील तर भविष्यात धोखाधडी संबधी घटना घडणारच नाही असे नमूद केले.
अत्यंत प्रेरणादायी व्यक्तित्व ज्यांचा परिचयच त्यांची उंची सांगणारा आहे असे बाॅलिवूडचा सर्वात मोठा सम्मान “आईफा अवार्ड”(प्रेरणादायी स्पीकर) विजेता, दोन व्यक्तिगत व दोन समुहात असे चार *गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड* विजेता, जगविख्यात गायिका दिवंगत लतादीदींच्या सुरक्षा टीमचे पोलिस अधिकारी, पोलिस विभागात अनेक पदांवर राहिलेले व तानकर म्युझिक ऐकेडेमीचे संचालक, गायक व प्रेरणादायी स्पीकर श्री. कैलाश तानकर, निवृत्त पोलिस उप अधीक्षक कालचे विशेष आकर्षण होते.
त्यांनी आपल्या ऊद्बोधनाची सुरुवात सुप्रसिद्ध कवी सोहनलाल द्विवेदी लिखित व बाॅलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन द्वारा प्रस्तूत “कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती” या सुंदर कवितेने केले. त्यांनी म्हटले की, गरीब किंवा श्रीमंत हा आपल्या कर्माने होतो. भारताचा सर्वात अमिर अदानी व विश्वाचा सर्वात अमिर ‘ऐलन मस्क’ यांचे गंमतीदार किस्से सांगून ते कसे श्रीमंत झाले व आपल्याला काय करायची गरज आहे “Successful people don’t do different things they do things differently” हे कोट केले. भारतीय रियल ईस्टेट ऐसोसिएशन ने ऊचललेले हे पाऊल अतिशय वाखाणण्याजोगी आहे व यातून निश्चितच सलाहकारांचा फायदा व विकास होईल अशी प्रेरणा देऊन व एक सुंदर गाणे ” या जन्मावर या जगण्यावर” गाऊन उपस्थितांना प्रोत्साहित केले. त्यांची ऊपस्थिती अत्यंत प्रभावी व परिणामकारक होती. निरुत्साही झालेल्या सर्वांना आशेचा एक किरण मिळाला व अश्याने ही संघटना लवकरच फुलेन, फळेन व उंची गाठेल यात शंका नसावी.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजविरसिंह यांनी नेमक्या कामाच्याच गोष्टी करुन मिटिंगमध्ये ऊपस्थित नविन सलाहकारांना दिलासा दिला व हा रियल ईस्टेट बिझीनेस ईमानदारीने केल्यास सर्वांना किती फलदायी, उंचीवर नेणारा आहे हे पटवून दिले. संघटनेद्वारे भविष्यात प्रशिक्षण, महारेरा रजिस्ट्रेशन प्रक्रिया, व धोखाधडी टाळण्यासाठी करावयाचे उपचार या गोष्टींवर भर दिला.
त्यांनी म्हटले मला माहित नाही आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो पण जे काही करता येईल ती करायची तयारी मात्र नक्कीच ठेवू. सर्व काही कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी व त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही सरकारला विनंती पण करणार आहोत की जे महारेरा नोंदणीकृत आहेत त्यांना 20 लाख ग्रुप विमा आणि रु.5 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा सहाय्यता रक्कम मिळावी. 5 लाख वैद्यकीय विम्याची रक्कम किमान पाच वर्षांसाठी असावी, महारेरा नोंदणी पूर्वीप्रमाणेच केली जावी, या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि उत्पन्न नसलेल्या कमी शिक्षित सल्लागारांवर किंवा सेवानिवृत्त लोकांवर परीक्षेचा भार न टाकता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये, तसेच एक आयोग बनवून योग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि महारेरा सल्लागारांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. त्यांच्या अथक प्रयत्नाने महारेरा रजिस्ट्रेशन फिसवर लागणारे जी.एस.टी. आता रद्द करण्यात आले आहे. ही संस्थेची प्रथम ऊपलब्धी आहे. व अश्याच ऊपलब्ध्या लागोपाठ होत राहतील तेव्हा सर्व आशादायी सलाहकारांनी एकजूट होण्याचे व संघटनेचे सदस्य होण्यासाठी निवेदन केले.
आम्ही एक ज्ञापन मा. पोलिस आयुक्तांना दिलेलेच आहे, त्यांच्या कडून आम्हाला प्रभावी दिलासा मिळाल्यावर तो देखिल उद्धृत करुच. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत सल्लागारांनी सर्व सल्ले मान्य करीत अनुमोदन दिले. या बैठकीचे संचालन प्रवक्ते व मिडिया प्रभारी श्री. संजय सोनारकर यांनी केले व प्रमुख अतिथींचा परिचय श्री. आनंद कोहाड यांनी करुन दिला.
या बैठकीत संस्थेचे सर्व पदाधिकारी व सलाहकार यांनी संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. त्यांच्या ऊपस्थित अनेक सूचनांवर चर्चा करण्यासाठी लवकरच अश्या प्रभावी बैठका घेण्यात येतील व अश्या बैठकीचे स्वरूप आणखी वाढेल ही बैठक यशस्वी व संपन्न झाली.