- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पतसंस्थांसाठी आयोजित तीन दिवशीय अनिवासी कार्यशाळा संपन्न

नागपूर समाचार : नागपूर जिल्हातील पतसंस्थांची संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी विविधउपक्रम राबवीत असते. नागपूर जिल्हा संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 01,02, व 03 मार्च 2024 ला दुपारी 12.30 ते 03.30 या कालावधीत संत्रा नगरीतील सुप्रसिद्ध सभागृह कविवर्य सुरेश भट, रेशीम बाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. या अनिवासी कार्यशाळा व पतसंस्था संचालक व कर्मचारी एकत्रिकरणासह नागपूर जिल्हा पतसंस्थाने भारतीय इतिहासात प्रथम संस्थांचे कारभारावर आधारित पतदर्शन’ हा लघु चित्रपटाची निर्मिती करण्यात आली व लघु चित्रपट सहकार चळवळीतील दिवंगत कार्यकर्ते स्व. वि.ना. देशपांडे, स्व. रविंद्र सातपुते व स्व. मधुकर येवले त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला.

या प्रसंगी त्यांचे नातेवाईकांपैकी श्रीमती चंदा सातपुते, श्री. मंगेश सातपुते श्रीमती मंदा येवले आणि स्व देशपांडे यांची भाची सौ. सोनालिका अडयाळकर यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेले होते. जवळपास 1 तास 20 मिनिटांचा पतदर्शन’ या मराठी लघु चित्रपटाच्या माध्यमातून पतसंस्थांचा दैनदिन कारभार सभासद, ठेवी, कर्ज वसुली, गुंतवणूक आणि सहकारी कायद्यातील तरतुदी याचा अगदी साध्या आणि सोप्या शब्दात व उवापोह करण्यात आलेला आहे. हा लघुचित्रपट पतसंस्था चळवळीस दिशा ठरेल.

नागपूर जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष राजेंद्र घाटे व त्याचे चमूचे नवीनतम उपक्रम नेहमीच प्रेरणा देणारेच असतात. मग त्यांची संत्रानगरी सहकार डिरेक्टरी, पतसंस्था मॅन्यूअल, सिबिल च्या धर्तीवर संगणक यंत्रणा पतसंस्था साक्षरता अभियान दिनदर्शिका, न्यू संत्रानगरी सहकार प्रतिबिंब असो राज्यातील पतसंस्था चळवळीस दिशा देणारेच आहे. अशा विश्वास राज्य फेडरेशन चे अध्यक्ष व चळवळीचे शिरोमणी काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केला. पतदर्शन चित्रपट पाहतांना नागपूर जिल्हातील पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्याना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, ना. ना. सह. बँकेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सहकार तज्ञ प्रा. जगदीश किल्लोळ, किशोर भागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री महेश तिवारी व आभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विलास लेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे व्यवस्थापक श्री निलेश रेवस्कर व संपूर्ण संचालक मंडळाने सदस्य प्रयत्न केलेत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *