नागपुर समाचार : NHH जपान, दिक्षाभुमी स्मारक समिती व विक्तुछाया बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिक्षाभुमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विद्यार्थ्यांकरिता परदेशात विशेशतः जपान मधे विविध क्षेत्रात उपलब्ध शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करण्या करिता जपान येथील मैक्सिस कंपनी चे संचालक श्री ईचीरो कोईके, एआयएम जपान चे संचालक श्री नोझाकी मासाहिरो, श्रीमती अर्चना मोटघरे, जपान वेल्फेअर कन्सल्टेटिव्ह संघटनेचे श्री शिबाता कोसाई, श्री टाकेडा शुआई, एन एच एच जापान चे कार्यकारी अधिकारी श्री प्रज्वलित मोटघरे आणि विक्तुछाया बहुउद्देशीय संस्थे चे संस्थापक श्री सिद्धार्थ देशभ्रतार प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास अभिवादन करण्यात आले, या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगतांना सिद्धार्थ देशभ्रतार यांनी सांगितले की, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षण हेच सर्वांगीण उन्नतीचे साधन आहे व उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. श्री प्रज्वलित मोटघरे यांनी जपान मध्ये असलेल्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या विषयावर विस्तृत माहिती दिली त्याबरोबर जपान येथुन विशेषतः आमंत्रित सर्व पाहुणे मंडळींनी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती प्रिया चांदुरकर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी, युवक व पालक उपस्थित होते.