नागपूर समाचार : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ग्रीन सिटी क्लब हाऊस गोटाळ पांजरी येथे महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून सौ मेघा नारनवरे (डायरेक्टर सीपीएस स्कूल) या होत्या.
याप्रसंगी आपापल्या क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला यात पुनम नाळे (माय असेट इन्फ्रा), डॉक्टर. धनश्री बर्डे, सौ ज्योती द्विवेदी (पत्रकार) जायभाय मॅडम (बेलतरोडी पोलीस स्टेशन) पुनम हिंदुस्तानी (कवयत्री), सो प्रीती इंगळे (सरपंच वेळा हरिश्चंद्र) सौ भावना रामटेके (वॉर्ड मेंबर गोटाड पांजरी), सौ नीता पिसार, सौ संध्या नेवारे, आशा सोमकुवर, सौ प्रियंका नखाते. आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महिलांनी काही स्टॉल देखील लावले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखी महिला मंच गोटाड पांजरी येथील सौ मेधा चिटगोपेकर, सौ अंजू राजाभोज, सौ स्वाती वैष्णई, सौ संघमित्रा धेंडे, सौ निशा सर्जेकर, सौ सुनीता खोब्रागडे, सौ नीलिमा चौधरी, सौ नीलिमा गिरडकर, सौ स्मिता नंदेश्वर इत्यादी महिलांनी अथक परिश्रम केले.