आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
दिनांक १२-०३-२०२४ रोजी हिंगणघाट विधान सभा क्षेत्रातील सेलू तालुक्यातील परसोडी व दिग्रस गावातील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. १२ रोजी आ. समीर कुणावार यांच्या हिंगणघाट येथील स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने भूषण उगेमुगे, विजय चन्ने, पुंडलिकराव फटिंग , मारोतराव पांगुळ, मंगेश उगेमूगे , विनोद चंद्रावल, सुनील युवनाते, श्रीरामजी पांगुळ, संजय धुर्वे, ज्ञानेश्वर पंधराम, सदाशिव मरापे, महादेव मरापे, रमेश पांगुळ, नामदेव मरापे, संजय कोपरकर, मुकेश कुंबरे, स्वप्नील ईरपाते, शंकर वरखडे, पांडुरंग आत्राम, दिनेश ईरपाते ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ दिघे, जिल्हा महामंत्री भाजपा आकाश पोहाणे, भाजपा समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, शंकरराव मुंजेवार, अमोल गवळी, प्रवीण शिर्शीकर, बालू इंगोले, समाजसेवक सुनील डोंगरे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.