नागपूर समाचार : कांशीरामजी प्रेरणा मंच नागपूर तर्फे पत्रपरिषद घेण्यात आली. कांशीरामजी यांच्या 90 व्या जयंती उत्सव समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये करून बाबासाहेबांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक तथा राजकीय विचारांना गतिमान करून बहुजन समाजात चेतना निर्माण करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवून जितेंद्र घोडेस्वार यांनी पत्रकारांना माहिती दिली.
शुक्रवार 15 मार्च रोजी दुपारी कांचीरामजी टी पॉइंट टेका येथे दुपारी 4 वाजता लेझीम व 5 ते 8 या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शाहीर पुरुषोत्तम खांडेकर व सचं (सम्यक सांस्कृतिक लोक कला निकेतन) यांचा / खडी गंमत कला पथक / आदिवासी नृत्य लेझीम याचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र घोडेस्वार तसेच प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, इंजिनियर पी .एस. खोब्रागडे, प्रमुख उपस्थितीत हरीश राऊत, नागोराव जयकार, नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम यांची उपस्थिती राहणार आहे. असे पत्रकारांना सांगितले. यावेळी मंचावरील जितेंद्र घोडेस्वार, उमेश मेश्राम, गौतम पाटील, नरेश वासनिक, राजू चांदेकर यांची उपस्थिती होती.