नागपूर समाचार : जिजाऊ सुपर मार्ट च्यावतीने महिलांनी महिलांकरता दिलेली एक सुवर्णसंधी म्हणून महिलांसाठी बॉक्स क्रिकेट च्या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आणि औद्योगिक स्टॉलचे उद्घाटन शिवश्री विकास ठाकरे पश्चिम विभाग नागपूरचे आमदार यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच रवींद्रजी ठाकरे आयएएस आणि प्रभाकरराव देशमुख प्रसिद्ध उद्योजक यांची उपस्थिती राहतील. प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाचे मधुकरराव मेहकरे, सुलभाताई कुथे, विनोदजी काळे, पुरुषोत्तमजी कडू, अल्फियाताई शेख आणि राकेशजी पन्नासे यांची उपस्थिती राहतील.
जिजाऊ सुपर मार्ट मराठा सेवा संघ लॉन्स सुर्वे नगर नागपूर येथे दिनांक 15 ते 17 मार्च या दरम्यान सायंकाळी 5:00 वाजता. ह्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. याप्रसंगी बक्षीस वितरण करण्यात येईल. प्रथम 9000 रुपये – दुसरे बक्षीस 7000 आणि तृतीय बक्षीस 5000 तसेच विविध उत्तेजनार्थ कामगिरी करितांना अनेक बक्षीस देण्यात येईल असे म्हटले गेले आहे.
जिजाऊ सुपर मार्ट आयोजित महिला बॉक्स क्रिकेट 2024
जिजाऊ सुपर मार्ट कडून या उपक्रमाचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे महिलांचे प्रत्यक्ष क्षेत्रांमध्ये सक्षमीकरण, सबलीकरण, तसेच सर्वांगांनी विकास व्हावा आणि सोबतच कुटुंब समाज व देशाचा विकास व्हावा. मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर आहे.
नागपूरला जिजाऊ सुपर मार्ट स्थापना केली आणि हे मार्ट खूप चांगल्या प्रकारे चालत आहे. आणि या माध्यमातून महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संचालिका याकरिता कटिबद्ध आहेत. मुख्य संचालिका जया देशमुख, कल्पना मेहकरे, वृंदा ठाकरे, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, प्रणाली दळवी, स्वाती शेंडे, मोहिनी काळे, लीना निकम, मंगला काळे, अनुपमा पोद्दार, यांची उपस्थिती होती.