नागपूर समाचार : जागतिक जल दिनानिमित्त, विश्वराज फाऊंडेशननी उपाय एनजीओसह जलसंवर्धन, आपले जलस्रोत आणि पर्यावरण या विषयावर आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील शाळांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे 50 शाळांनी सहभाग घेतला. यावेळी भांडेवाडी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात विजेत्यांचा सत्कार कार्यक्रम व जनजागृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात कु. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता, पीएचई विभाग, एनएमसी नागपूर यांनीउपस्थितांना जलसंधारणाविषयी मार्गदर्शन केले आणि नागरिकांना पाण्याचा पुनर्वापरकरण्याचे आवाहन केले.
श्री सत्यजित राऊत, डायरेक्टर स्ट्रॅटेजी, व्हीईपीएल यांनी उपस्थितांना संबोधित केले आणिसांडपाणी प्रक्रिया आणि आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी त्याचे महत्त्व याबद्दलमाहिती दिली. या कार्यक्रमाला विश्वराज एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे अधिकारी, उपायएनजीओ, तिरपुडे सोशल वर्क कॉलेजचे अधिकारी, शाळेतील शिक्षक, विजेते विद्यार्थी आणि समाजातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेत्या शाळांची नावे: एशियाटिक सेंट्रल स्कूल, सदर्न पॉइंट हायस्कूल, बी.जी. श्रॉफ गर्ल्सहायस्कूल, राही सेंट्रल स्कूल आणि पकवासा गुजराती हायस्कूल.
कौशल्य विकास केंद्र जागतिक जल दिनानिमित्त विश्वराज फाउंडेशनतर्फे समाजाला भेट
समाजातील रहिवाशांसाठी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन सुश्री श्वेता बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. भांडेवाडीच्या शेजारची झोपडपट्टी असलेल्या संघर्ष नगरमधील तरुणांच्या उन्नतीसाठी हा सामाजिक विकासाचाउपक्रम आहे. सध्या 2 गरजांवर आधारित अभ्यासक्रम आहेत जसे की संगणक प्रशिक्षण आणि शिवण / शिलाईमशीन प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि भविष्यात आणखी बरेच काही जोडले जातील.