नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी विदर्भ प्रदेश धनगर परिषद व भारतीय लोकमत राष्ट्रवादी पार्टीने समर्थन दिले आहे.
नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अनेक विकासकामे नागपुरात झाली आहेत आणि गेल्या दहा वर्षांमध्ये शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. नागपूरला देशातीलच नव्हे तर जगातील एक उत्तम शहर म्हणून नावलौकीक प्राप्त करून देण्यासाठी ना. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना साथ देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे दोन्ही संघटनांनी म्हटले आहे. ‘या निवडणुकीत धनगर समाज आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहून उमेदवारीस पाठिंबा देत आहे,’ असे विदर्भ प्रदेश धनगर परिषदेचे समन्वयक श्री. पुरुषोत्तम डाखोळे आणि प्रमुख संघटक श्री. रमेश पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. ‘भारतीय लोकमत राष्ट्रवादी पार्टी आपल्याला विनाशर्त समर्थन देत आहे,’ असे संघटनेचे प्रभारी प्रमोद दवलेकर आणि सचिव आयेशा शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.