नागपूर समाचार : भारतीय रिझर्व बँकेचे संचालक व सहकार भारतीचे संस्थापक सदस्य मा श्री सतीशजी मराठे हे नागपूर येथे भारतीय रिझर्व बँकेच्या बैठकीसाठी आले असताना त्यांनी नागपुरातील विविध संस्थांना भेटी देऊन तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
शिक्षक सहकारी बँकेमध्ये बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मा श्री अनिलजी सोले यांनी त्यांचे स्वागत केले. धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा सौ निलिमाताई बावणे व देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोरजी बावणे यांनी त्यांचे स्वागत केले.
विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष व सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री विवेक जुगादे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच सहकार भारती नागपूर महानगर व जिल्हा यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक तसेच विविध विषयांवर चर्चा केली.
याप्रसंगी सहकार भारती नागपूर जिल्हाध्यक्ष श्री संजय रोकडे, जिल्हा महामंत्री श्री चंद्रशेखर लांडे, नागपूर महानगर महामंत्री श्री किरण रोकडे, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे, नागपूर महानगर उपाध्यक्ष श्री स्वप्निल मोंढे, महिला सहप्रमुख सौ संगीताताई ठाकरे, संघटनेचे पदाधिकारी श्री संदीप भोंगाडे गुरुजी, श्री राजेश गायधने, श्री मंगेश भाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या प्रवासादरम्यान भारतीय रिझर्व बँक, नागपूरचे अधिकारी श्री नीरज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.