उमरेड समाचार : सध्या राज्यामध्ये सर्वत्र निवडणूकी संबंधात आदर्श आचार संहिता सुरू आहे. अश्यातच भंडारा जिल्ह्यातील तालुका मोहाडी येथे धिरेंद्र शास्त्री यांचा दिनांक २८/०३/२०२४ पासून प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. दिनांक २९/०३/२०२४ ला यांचे प्रवचनातून मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याज्ञकार्यावर व सेवकांवर भगवान बाबा हनुमानजींच्या भक्तीवर अपद्रव उद्गार काढून प्रवचन केल्यामुळे महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या सर्व सेवकांच्या भावना दुखावल्या असल्यामळे सेवकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून तिव्र आक्रोश तयार झालेला आहे. सदर मोहाडी तालुका येथील प्रवचन तात्काळ बंद करून अश्या संधीसाधू धोंगी व्यावसायिक महाराजावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी.
सध्या दिनांक ३ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता किंवा शांतता सुव्यवस्था भंग होणार नाही याकरीता अश्या संधीसाधू धोंगी व्यावसायिक महाराजावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला अटक करून आम्हाला न्याय देण्यात यावा. अशी मागणी परमात्मा एक सेवक संघटना, उमरेड द्वारे करण्यात आली.
निवेदन देण्याकरीता संस्था सचिव हरिचंद्र गवळी, मधुकर अडडक, ज्ञानेश्वर ब्रम्हे, गंगाधर वाघमारे, गुरुदेव डपकस, कैलास पाटील, अमोल मांढरे, नंदु मांढरे, शंकर मोहिनकर, तुकाराम शेन्डे, नरेश मारबते, शंकर कामडी, विजु रोहणकर, रवि फुलझेले, सुनिल गिरडे, सुरज डहारे, शिला झिलपे, मिना नंदनवार, वसंत वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.