नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दक्षिण नागपुरात दमदार स्वागत झाले. यावेळी प्रत्येक वस्तीमध्ये नागरिकांनी पुष्पवर्षाव केला आणि यात्रेत सहभागी झाले.
मेडिकल चौकातील राजाबाक्षा मंदिर येथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या व माजी मंत्री सुलेखा कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी महापौर संदीप जोशी, माजी नगरसेवक संदीप गवई आदींची उपस्थिती होती. राजाबाक्षा येथून ऑरियस हॉस्पिटल, वंजारी नगर, चंद्रमणी नगर या मार्गाने सिद्धेश्वर सभागृह, ज्ञानेश्वर नगर असा लोकसंवाद यात्रेचा प्रवास झाला.
ना. श्री. गडकरी यांच्या प्रचाररथावर प्रत्येक वस्तीत नागरिकांकडून पुष्पवर्षाव झाला. त्याचवेळी महिलांनी औक्षण करून ना. श्री. गडकरी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यात्रेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. प्रचाररथासोबत निघालेल्या बाईक रॅलीने वातावरण निर्मिती केली. ‘नितीनजी आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘कहो दिल से नितीनजी फिर से’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. विशेष म्हणजे संपूर्ण यात्रेत विविध समाजाच्या, धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
ना. श्री. गडकरी यांनी हजारो दिव्यांगांना आतापर्यंत कृत्रिम अवयव, ट्रायसिकल आदी साहित्य वितरित केले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही वस्त्यांमधील दिव्यांगांनी ना. श्री. गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे अतिशय आनंदाने स्वागत केले. ओंकारनगर, अमरनगर, विनायक नगर, कोहळे ले-आऊट, या मार्गाने दिघोरी परिसरात यात्रेचा समारोप झाला.
लोकसंवाद यात्रा आज पूर्व नागपुरात
ना. श्री. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा उद्या (गुरुवार, दि. ४ एप्रिल) पूर्व नागपुरात दाखल होणार आहे. छापरुनगर चौक येथील झाडे भवन येथून सकाळी नऊ वाजता यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर कुंभार टोली, शास्त्रीनगर, जय भीम चौक, व्यंकटेश नगर, दर्शन कॉलनी, गायत्री कॉन्व्हेंट, प्रियदर्शनी कॉलेज, हसनबाग, न्यू सहकारनगर, मित्र विहार नगर, ओम मेडिकल रोड, भवन्स शाळा, प्रज्ञाशील बौद्ध विहार, विदाय नगर, गोपाळ-कृष्ण नगर, श्री. बंटी कुकडे ऑफिस, शंकर फार्मसी, जगत पब्लिक, मैत्री चौक, गुप्ता पॅलेस, खंडवाणी टाऊन, वाझे ट्युशन्स, गजानन डेली नीड्स, गिड्डोबा मंदिर चौक या मार्गाने गोरा कुंभार समाज भवन येथे यात्रेचा समारोप होईल.