दक्षिण नागपुरात गडकरींवर जागोजागी पुष्प वर्षाव:
गडकरींचे शक्ती प्रदर्शन परिवर्तन चौकात लोकांची भयंकर गर्दीच गर्दी!
शिव जन्मोत्सव समिती, खंजरी भजन मंडळ मानेवाडा आणि शशांक खेकरे मित्र परिवार यांच्यातर्फे नितीन गडकरींचे भव्य स्वागत.
नागपूर समाचार : भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीनजी गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे बुधवारी दक्षिण नागपुरात दमदार स्वागत झाले. यावेळी प्रत्येक वस्तींमध्ये नागरिकांनी पुष्प वर्षाव केला आणि यात्रेत सहभागी झालेत. मेडिकल चौकातील राजाबाक्षा मंदीर येथून यात्रेला प्रारंभ झाला होता. यावेळी माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, आमदार मोहन मते, आ.प्रवीण दटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, संजय भेंडे, संदीप जोशी, संदीप गवळी इत्यादींची उपस्थिती होती. लोकसंवाद यात्रेचा प्रवास सुरू असतांना परिवर्तन चौकातील शिव जन्मोत्सव समिती भव्य खंजरी भजन मंडळ आणि शशांक खेकरे मित्र परिवारा च्यावतीने गडकरींचे भव्य स्वागत करून क्रेन द्वारा मोठा पुष्पहार अर्पण करण्यात आला व गुलाबांच्या पंखळ्याने त्यांचं स्वागत केले.
दक्षिण नागपुरातील नागरिकांना 75 टक्के मतदान करावे व झालंच पाहिजे आणि पाच लाखांच्या वर मतांनी विजय झालाच पाहिजे असा संकल्प करा अशा प्रकारचा सल्ला नितीन गडकरी यांनी लोकसंवाद यात्रेतील नागरिकांना दिला. गडकरी यांच्या प्रचार रथावर प्रत्येक वस्तीत नागरिकांकडून पुष्प वर्षाव झाला त्याचवेळी महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यात्रेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रचार रथासोबतच निघालेल्या बाईक रॅलीने वातावरण निर्मिती केली. संपूर्ण यात्रेत विविध समाजाच्या, धर्माच्या, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गडकरी यांचे स्वागत केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. गडकरींच्या भव्य स्वागताचे आयोजन दक्षिणच्या मा.नगरसेविका सौ.मंगलाताई शशांक खेकरे यांनी केले होते.