- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेला हंसापुरी, मोमीनपुरा येथे ना. श्री. गडकरींचे जोरदार स्वागत!

मध्य नागपुरातील लोकसंवाद यात्रेमध्ये कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे आज (सोमवार) तांडापेठ, हंसापुरी, मोमीनपुरा येथे जोरदार स्वागत झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मध्य नागपुरातील बारईपुरा-राऊत चौक येथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक कामिल अंसारी, माजी नगरसेवक संदीप गवई, माजी नगरसेविका यशस्वी नंदनवार, माजी नगरसेविका आभा पांडे, माजी नगरसेवक संजय महाजन, शिवसेना (शिंदे गट) नेते सुरज गोजे, माजी नगरसेविका विद्या कन्हेरे, माजी नगरसेविका सरला नायक आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोज चौक, नाईक तलाव, बनसोड चौक, विणकर कॉलनी या भागांमधील नागरिकांनी उत्साहाने रॅलीत सहभाग घेत ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले. काहींनी पुष्पवर्षाव करून तर काहींनी पुष्पहार घालून ना. श्री. गडकरी यांचे स्वागत करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकसंवाद यात्रेसाठी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. महिलांनी घरापुढे सुरेख रांगोळी रेखाटली होती. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. तर काही वस्त्यांमध्ये ना. श्री. गडकरी यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. मोमीनपुरा येथे हिंदू-मुस्लिम एकता मंचाने गडकरींच्या स्वागतासाठी स्टेज उभारला होता. तर तांडापेठ येथे रेखा गिरधारी निमजे व मंडळाने भजन गाऊन गडकरींचे स्वागत केले. ना. श्री. गडकरी यांनी यात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधला. ‘गेल्या दहा वर्षांपासून नागपूरसह संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. या काळात शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आता मी पुन्हा जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलोय,’ अशा भावना ना. श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या. धोडबा चौक परिसरात यात्रेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *