नागपुर समाचार : दलित पँथर संघटनेच्या वतीने नागपुर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांना सक्रीय समर्थन व पाठींबा देण्याबाबत दलित पँथर संघटनेच्या कार्यकारिणीने निर्णय घेतला. नितीन गडकरी यांच्या प्रचार व निवडणुक कार्यात दलित पँथर संघटना सहभागी होणार आहे.
भारताचे विकासपुरूष म्हणून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते देशाचे रस्ते विकास व महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी अतुलनीय कार्य केले आहे. दलित पँथर संघटनेने या कार्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. नितीन गडकरी चे संघटनेला सदोदित सहकार्य लाभत असल्या मुळे संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
दलित पँथरही महायुतीचा घटक म्हणून कार्यरत आहे.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नपुर्तीसाठी दलित पँथर कार्यकर्ते राज्यभर हिरीरीने कार्य करीत आहेत.