नागपूर समाचार : नागपूर लोकसभा निवडणूकीकडे नागपूरकरांच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. महागाई, बेरोजगारी आणि मुलभूत सुविधांचा मुद्दा प्रत्येकाला भेडसावत आहे. त्यामुळे जनता आता भाजपा विरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. याचीच प्रचिति उत्तर नागपुरातील जन आशीर्वाद यात्रेतून दिसून आली. सकाळी आठ वाजता सुरु झालेली यात्रा ही चक्क दुपारी साडेतीन पर्यंत चालली असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितले.
मध्य नागपुरातील मनपा लाल स्कूल, भुलेश्वर नगर येथे आयोजित सभेत ते बोलते होते. मंगळवारी सकाळी उत्तर नागपुरातील क्लार्क टाऊन येथून जन आशीर्वाद यात्रेला झाली. नझुल लेआऊट-अंगुलीमान बुद्ध विहार – आंबेडकर नगर-लाल शाळा-इंदोरा मोठा बुद्ध विहार-जुनी ठवरे कॉलनी- आवळेनगर-कामगार नगर चौक-कपिल नगर-बाबा दिपसिंग नगर -समता नगर-आर्य नगर-जागृती नगर-इंदिरा नगर-मार्टिंन कॉलनी-कस्तुरबा नगर-जरीपटका बाजार मेन रोड मार्गे जिंजर मॉल पोहोचेपर्यंत हाजोरांच्या संख्येत नागरिक स्वयं फूर्तीने सहभागी झाले.
यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, वेदप्रकाश आर्य, महेंद्र भांगे, दिनेश अंडरसहारे, संदीप सहारे, मनोज सांगोळे, मनोज बनसोड, सुरेश जग्यासी, स्नेहा निकोसे,भावना लोणारे, विवेक निकोसे, रोहित यादव यांची उपस्थिती होती.
सायंकाळच्या सत्रात मध्य नागपुरातील भुलेश्वर नगर, पूर्व नागपुरातील जयभीम चौक हिवरी नगर आणि उत्तर नागपुरातील भिम चौक, नारा रोड येथे झालेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. जाहीर सभेत माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तमेवार, आमदार अभिजित वंजारी, अतुल लोंढे, विशाल मुत्तमेवार, बंटीशेळके यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
क्रेनवरील “त्या” बॅनरने संचारला उत्साह
उत्तर नागपुरात सुरु असलेल्या यात्रेत हजारोंच्या संख्येत नागरिक सहभागी झाल्यावर जिंजर मॉल परिसरात विकास ठाकरे यांची यात्रा पोहोचात “हर ओर अंधेराहै, ईमादार नेता ही आने वाले कल का सबेरा है, भावी खासदार विकासभाऊ ठाकरे” या ओळींसह मोठे बॅनर क्रेनवर चाहत्यांनी झळकवताच यात्रेत सहभागींमध्ये उत्साह संचारला. तसेच दिवसभर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.