आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट/समुद्रपूर समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते तसेच महीला आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. १३ रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर तालुक्यातील शेगाव (गोटाडे ) येथील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी
आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि.१३ एप्रिल २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने वंदनाबाई चौधरी, पुष्पाबाई वैद्य, सरस्वती बेलेकर, संगीताबाई चौधरी, मीराबाई लाखे, चंद्रकलाबाई मेश्राम, ताराबाई बेलेकर, वर्षाताई बेलेकर, मंजुषा खीरडकर, माधुरी वराडकर, वंदनाताई चौधरी, मंगलाताई चौधरी, शशिकला पोटकर, गीता धुर्वे, रामदास धुर्वे ईत्यादी महिला व पुरुष कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आ. समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी आ. समीर कुणावार यांचेसह भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रवी उपासे, ओबीसी मोर्चा भाजपाचे शहराध्यक्ष अनिल चाफले, माजी नगरसेविका वंदनाताई कामडी, समाजसेवक देवा पडोळे, राजू माडेवार, ओबीसी मोर्चा भाजपा विधानसभा प्रमुख विवेक तडस, मुन्ना त्रिवेदी, दिपालीताई लाखे, बंडूभाऊ लाखे, रुपेश सौदरकर इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.