मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : सीमेंट रस्ता बांधकामाकरिता ३१ ऑक्टोबर पर्यंत वाहतूक बंद
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत पोलिस लाईन टाकळी ते पागलखाना चौक पर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत, पॅकेज क्रमांक ७ मधील रस्ता क्रमांक ३० पोलिस लाईन, टाकळी फीडर रोड, अवस्थी नगर चौक ते पागलखाना चौक पर्यंत सीमेंट रोडचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामामुळे या मार्गावरील उजव्या बाजूकडील वाहतूक ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहिल. यामार्गावरील वाहतूक डाव्या बाजूने दुतर्फा व वळती रस्त्यांवरून वळविण्यात येणार आहे.