नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. १ मे) मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वज वंदन झाले.
याप्रसंगी उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, डॉ. रंजना लाडे, श्री. मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, श्रीमती अल्पना पाटणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतिक रहमान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, कार्यकारी अभियंता सर्वश्री विजय गुरुबक्षाणी, योगेंद्र राठोड, अनिल गेडाम, सामान्य प्रशासन विभागाचे श्री. श्याम कापसे, श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मनपाचे संगीत शिक्षक प्रकाश कलसिया, कृणाल दहेकर (तबला) आणि कमलाकर मानमोडे (हार्मोनियम) यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले.