◾कसाबच्या वक्तव्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समाचार
◾विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली- बावनकुळे
◾भाजपालाविरोध करण्यासाठी २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता?
◾विजय वडेट्टीवार यांचा व्हिडिओ एक्सवर टाकत चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
◾भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात
महाराष्ट्र समाचार : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला.
निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपालाविरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा.
जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे.
काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.