◾अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचा उपक्रम:महासंघाचे अखिल भारतीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती
◾सर्व शाखीय,सर्व भाषिक भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे महासंघाचे आवाहन
नागपूर समाचार : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव अक्षय्य तृतीयाच्या दिवशी साजरा केला जातो मात्र,हा दिवस घरोघरी पूजनाचा तसेच पूर्वजांना पान दाखवण्याचा असल्यामुळे येत्या रविवारी १२ मे रोजी भगवान परशुरामांचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ नागपूर युनिटचे अध्यक्ष नितीन पटवर्धन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष पंकज खिरवडकर ,जय पाठक,कोषाध्यक्ष हेमंत दस्तुरे,तांत्रिक विंगचे प्रमुख अंकुश हरकरे,रॅलीचे समनव्यक पराग जोशी तसेच माध्यम समन्वयक श्रीनिवास पांडे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना पटवर्धन यांनी सांगितले की,ही रॅली धंतोली,वर्धा रोड गोरक्षण मंदिरापासून सकाळी ६.३० वाजता निघेल आणि नागपूरच्या मध्यभागातून मार्गक्रमण करीत प्रतापनगर येथील श्री राजराजेश्वरी देवी मंदिरात समारोप होईल.महत्वाचे म्हणजे या वर्षी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
गोरक्षण येथे प्रारंभी भगवान परशुरामांचे पूजन आणि आरती होईल,यानंतर रॅलीला सुरवात होईल.यावेळी उद् घाटक म्हणून नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल उपस्थित राहतील तर प्रताप नगर येथील श्री राजराजेश्वरी देवीच्या मंदिरात समारोपाला राज्याचे माहिती आयुक्त राहूल पांडे यांची उपस्थिती असणार आहे.
रॅली लोकमत चौक,काचीपुरा,अलंकार चित्रपटगृह, ,कुसुताई वानखेडे सभागृह, ट्रॅफिक पार्क,झेंडा चौक,मामा गल्ली,हिल रोड,राम नगर,लक्ष्मीनगर,शंकर नगर रस्त्यावर काम सुरु असल्याने पुढच्या गल्लीतून वळण घेऊन बजाज नगर येथे रॅलीचे मार्गक्रमण होईल,यानंतर श्रद्धानंद पेठ,माटे चौक,प्रताप नगर येथून श्री राज राजेश्वरी देवीच्या मंदिरात रॅलीचा समारोप होईल.रॅलीमध्ये आपातकालसाठी रुग्णवाहिका असणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
रॅलीचे ११ ठिकाणी स्वागत होणार असून दरवर्षी सर्व भाषिक तसेच सर्व शाखीय भाविक हे मोठ्या उत्साहात भगवान परशुरामांचे स्वागत करीत असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.रॅलीत शंखनादाची चमू,यानंतर सायकलस्वार,नारी शक्ती,दूचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांचा काफिला राहणार आहे.या रॅलीचा उद्देश्य आपल्या समुदायाची एकता आणि सांस्कृतिक उत्सहा द्विगुणीत करने हे होय.पराग जोशी यांच्या समन्वयाखाली २०० हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमाचे व्यवस्थापन सुनिश्चित करतील असे त्यांनी सांगितले.
राज राजेश्वरी मंदिरात अंतिम फेरी महाप्रसादाने चिन्हांकित केली जाईल.या महाप्रसादात जातीय सलोखा चिन्हांकित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की,भगवान परशुरामांचा जन्मोत्सव व रॅली ही फक्त ब्राम्हण समाजासाठी नाही तर सर्व जातीचे भाविक यात दर वर्षी अतिशय उत्साहात सहभाग घेत असतात.इतकंच नव्हे तर काचीपुरासारख्या ठिकाणी हिंदी भाषिक भाविक हे मोठ्या प्रमाणात रॅलीचे स्वागत करीत असतात.हेच दृष्य अनेक स्वागत ठिकाणी दिसून पडत,या रॅलीत मराठी ब्राम्हणच नव्हे तर हिंदी भाषिक भाविक यांचा सहभाग लक्षणीय असतो.मागच्या वर्षी तर विविध भाषिक भाविकांनी आमच्यावर देखील कोणती तरी जबाबदरी द्या,अशी मागणी केली,असे पटवर्धन यांनी सांगितले.
महासंघाचे उपक्रम याविषयी विचारले असता,गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जातो.सायरे नावाचा हूशार विद्यार्थी केवळ आर्थिक बाजू कमकुवत असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नव्हता.त्याच्या ‘नीट’च्या शिकवणी वर्गाचे दोन लाख रुपयांचे शुल्क महासंघाने भरले.आज तो नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाला असल्याची माहिती हेमंत दस्तुरे यांनी दिली.
भगवान श्री परशुरामांच्या जन्मोत्सवात भाविक मोठ्या उत्साहात सहभागी होतात मात्र,परशुरामांच्या विषयीचे शास्त्रोक्त ज्ञान असंख्य भाविकांना माहिती नाही.या रॅलीचा उद्देश्य भगवान श्री परशुरामांच्या विषयी अधिकाधिक माहिती भाविकांना व्हावी असा असल्याने रॅलीमध्ये परशुरामांच्या संपूर्ण दैवी कार्याच्या माहितीचे फलक भाविकांसाठी का समाविष्ट करीत नाही?असा प्रश्न केला असता,या सूचनेवर निश्चितच विचार केला जाईल व यावेळी परशुरामांच्या दैवी कार्याची माहिती दर्शविणारा फलक रॅलीसोबत असेल,असे आश्वासन त्यांनी दिले.
ओबीसींसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापित केले,मराठा जनआंदोलन देखील राज्यात सुरु आहे या पाश्वभूमीवर अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या श्री परशुराम ब्राम्हण महामंडळासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा,याविषयी छेडले असता,प्रयत्न सुरु आहे.नक्कीच त्यात यश येईल असे उत्तर महासंघाच्या सदस्यांनी दिले.