- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : बेलतरोडी पोलीसांचे रक्तदान शिबीर कार्यकम संपन्न

नागपूर समाचार :- शहरातील दोन दिवसा पुर्वी वृत्तपत्रात एम्स हॉस्पीटल, डागा हॉस्पीटल, मेयो हॉस्पीटल, मेडीकल हॉस्पीटल सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये फक्त दोन दिवस पुरेल ऐवढाच रक्त साठा उपलब्ध आहे. अश्याप्रकारचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशीत झाले याची दखल घेवुन, बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिनांक १७.०५. २०२४ रोजी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे माध्यमातुन सामाजीक बांधीलकीचा उपक्रमातुन गोरगरीब रुग्णांची हेळसांड होवु नये व खाजगी रक्तपोडी मार्फत रूग्णांचे नातेवाईकांची पिळवणुक होवु नये व गोर गरीब रूग्णांचे मदती करीता पोलीस ठाणे बेलतरोडी येथे एम्स हॉस्पीटल मार्फत रक्तदान शिबीर घेवून पोलीस ठाणे बेलतरोडी येधील कार्यरत असलेले २२ अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदानात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.

सदर रक्तदान शिबीर पोलीस उप आयुक्त परि, क. ४, सपोआ, अजनी विभाग यांचे मार्गदर्शनात वपोनि. मुकुंद कवाडे व पोलीस ठाणे बेलतरोडी ये अधिकारी व अमंलदार यांचे उपस्थितीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *