- Breaking News, अपघात, नागपुर समाचार

नागपूर/कामठी समाचार : विद्दूत धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

नागपूर/कामठी समाचार :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रा प महावितरण कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्याचा रणाळा येथील एका विद्दूत डी पी दुरुस्ती कामादरम्यान लागलेल्या विद्दूत धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान घडली असून मृतक कर्मचाऱ्याचे नाव भारत वायले वय 38 वर्षे रा जुनी कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक हा दैनंदिन प्रमाणे कार्यालयात गेला असता रणाळा येथील मोरबी टाईल्स समोरील इलेक्ट्रिक डी पी मध्ये आलेल्या बिघाड दुरुस्ती ला गेला असता कामादारम्यान अचानक विद्दूत धक्का लागल्याने जागीच मृत्युमुखी पडला.

तडकाफडकी सदर मृतकाला सिटी हॉस्पिटल नंतर शासकोय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र उपस्थित डॉक्टरणी मृत घोषित केले,.मृतकाच्या पार्थिवावर पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाच्या पाठीमागे पत्नी व दोन लहान मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *