- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 83 प्रकरणांची नोंद

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 22) रोजी उपद्रव शोध पथकाने 83 प्रकरणांची नोंद करून 53 हजार रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शैक्षणिक संस्था, कोंचिग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 19 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 2 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 04 प्रकरणांची नोंद

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता. 22) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत लख्ख्न पत्राडी भंडार संत्रा मार्केट, सतरंजीपुरा झोन अंतर्गत साक्शी स्वीट्स कांजी हाऊस चौक बिनाकी आणि मंगळवारी झोन अंतर्गत जन आहार मुख्य रेल्वे स्टेशन, आरकेएम स्टाल मुख्य रेल्वे स्टेशन या चार प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयाचा दंड वसूल केला.

याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत माधवबाग क्लिनिक वर्मा लेआऊट परिसरात कचऱ्याचे विभाजन न केल्याबाबत 1 प्रकरणाची नोंद करुन 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

श्रीमती दामिनी भोयर के.टी. नगर फेन्ड्रस कॉलनी अनधिकृत ठिकाणी हास्पिटलचा कचरा टाकल्याबाबत यांच्याकडुन 5 हजारा दंड वसुल करण्यात आला.

हनुमान नगर झोन अंतर्गत अविनाश कदम निलकंठ नगर हुडकेश्वर हिरवीगार झाडे तोडून रस्त्यावर फांद्या पसरविलेल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धरमपेठ झोन अंतर्गत सुभाष पटेल कॅनल रोड आणि मंगळवारी झोन अंतर्गत एकादशी अपार्टमेंट कस्तुरबा नगर या दोन प्रतिष्ठानांकडुन बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबात एकुण 20 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

मार्डन स्कुल पोलीस लाईन टकाळी जाफर नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 10 प्रकरणाची नोंद करून 60 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *