पोलिस आयुक्तालय नागपुर शहर तर्फे “एकत्र येऊया नशा मुक्त नागपुर घडवूया” कार्यक्रम संपन्न
नागपूर समाचार :- पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून नशा मुक्त नागपुर घडविण्याकरिता पोलिस आयुक्तालय नागपुर शहर व नुरी महफिल एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमानाने “एकत्र येऊया नशा मुक्त नागपुर घडवूया” कार्यक्रम दि. २४/०५/२०२४ चे १९:०० वा. दरम्यान एनएमसी ताजबाग हायस्कूल ठाकूर प्लॉट ग्राउंड मिनारा मस्जिद समोर, मोठा ताजबाग, नागपुर शहर या ठिकाणी पोलिस आयुक्त नागपुर शहर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मैत्री व्यसनमुक्ती केंद्र यांनी ‘हवामे उडणे की दवा’ या पथनाट्याने केली. या पथनाट्यामध्ये त्यांनी व्यक्ती कसा अमली पदार्थाच्या व्यसनाधीन होतो व त्याचे आपल्या शरीरावर कसे विपरित परिणाम होतात असा संदेश देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर कार्यक्रमास पोलिस आयुक्त यांनी अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनाधीन होणारा युवा वर्ग यामुळे वाढणारी गुन्हेगारी व त्यांचे वैयक्तिक आयुष्य व समाजावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन करून नागरिकांच्या सहकार्याने अमली पदार्थांच्या व्यसनाचे समूळ उच्चाटन करण्याची नागरिकांनी ग्वाही दिली.
तसेच सदर कार्यक्रमात संजय पाटील, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, शिवाजी राठोड, अप्पर पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग), प्रमोद शेवाळे अप्पर पोलिस आयुक्त(उत्तर विभाग), निमित गोयल पोलिस उप आयुक्त गुन्हे, विजयकांत सागर यांनी उपस्थित नागरिकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामबाबत तसेच त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच सदर कार्यक्रमात मार्गदर्शक वक्ते म्हणून १) हाफीज साकिर रजा,२) मुफ्ती जावेदुल कादरी ३) तुषार नातू, ४) डॉ. विनोद गजघाटे, ५) मुकेश काळे (अल्कोहोलिक अनानिमस ऑर्गनायझेशन) यांनी उपस्थित राहून व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हसन रजा यांनी केले. तसेच प्रास्ताविक गजानन गुल्हाने पोलिस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन हसन रजा साहेब यांनी केले. सदर कार्यक्रमास नागपुर शहरातील व्यसनमुक्ती केंद्राचे सदस्य, अमली पदार्थ व व्यसनमुक्तीचे क्षेत्रात काम करणारे एन जी ओ चे स्वयंसेवक, परिसरातील नागरिक, परिमंडळातील शांतता कमिटीचे सदस्य, जेष्ठ नागरिक व पत्रकर बांधव उपस्थित होते.