नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दहावीचा एकंदरीत निकाल ९५.८१ टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९७.२१ % असून मुलांचा निकाल ९४.५६ % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ टक्क्यांनी जास्त आहे.
दरम्यान राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १५६०१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५४९३२६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४८४४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.