- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटणाऱ्यांची गर्दी होती. राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ना. गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील लोकांची तौबा गर्दी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनील मेंढे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार डॉ. मिलींद माने, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार नागो गाणार, माजी आमदार अशोक मानकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये व डॉ. राजीव पोतदार, माजी जिल्हापरीषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यासह राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यावेळी ना. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

यासोबत वैद्यकीय, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकारिता, सहकार अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. चाहत्यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने मार्बल स्टोनच्या आधाराने तयार केलेले चित्र तर एकाने फळांनी भरलेली टोपली गडकरींना भेट दिली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांना दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री नारायण राणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, तेलगुदेसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार किशन काठोरे, भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे यांच्यासह केंद्रातील व विविध राज्यातील मंत्र्यांनी ना. गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांनी देखील ना. श्री. गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

औक्षण अन् लाडूतुला

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे कुटुंबियांनी सकाळी औक्षण केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांचीही उपस्थिती होती. त्यानंतर खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने ना. श्री. गडकरी यांची लाडूतुला करण्यात आली. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *