नागपूर समाचार : भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय लोकनेते, केंद्रीयमंत्री मा. नितीनजी गडकरींच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी २७ मे रोजी भाजपा नागपूर जिल्हा च्यावतीने सर्व विधानसभा येथे “भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर” संपन्न झाले.
काटोल विधानसभेतील शिबिराचे उद्घाटन मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, बोलताना मा. नितीनजी गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. मा.नितीनजी हे आधुनिक विश्वकर्मा असून यांच्या कल्पकतेमुळे देशाचा विकास झपाट्याने होत आहे, असे प्रतिपादन केले. मा.नितीनजी पुढील अनेक वर्ष आपल्या हातून नागपुरातील व देशातील जनतेची सेवा सातत्याने होत राहो यासाठी उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने जिल्हात १५०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. सर्व रक्तदातांचे जिल्हाच्या वतीने आभार मानले. तसेच सावनेर विधानसभा येथे डॉ. राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर संपन्न झाले. उमरेड विधानसभा येथे सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर व नेत्रदान तपासणी शिबिर मोठ्या संख्येने संपन्न झाले. तसेच कामठी विधानसभा व हिंगणा विधानसभा येथे आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर व हॉस्पिटल येथे फळ वाटप करून नितीनजींना वाढदिवस साजरा केला. व रामटेक विधनासभा येथे श्री मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, आ. समीर मेघे, आमदार टेकचंदजी सावरकर, सुधीरजी पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, चरणसिंग ठाकूर, दिनेश ठाकरे, अनिल निदान, सौ.संध्याताई गोतमारे, आदर्श पटले, रीन्केश चवरे, किशोर रेवतकर, समीर उमप, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.