हिंगणघाट समाचार : आज दिनांक ३० मे ला हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिनांक २९ मे ला महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात असलेल्या “क्रांती स्तंभ” येथे मनुस्मृती दहन आंदोलना दरम्यान विश्वभूषण प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने, राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य करून महापुरुष यांचा अवमान केल्याचे दिसून आले असल्याने त्यांच्या या संतापजनक कृत्याच्या निषेधार्थ हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला, मोर्चा,रिपाई-आ, तसेच सर्व आघाडीतील मंडळ अधिकारी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.