नागपूर समाचार :- उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर ग्रामीण यांचे पथकाकडून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई मध्ये एकूण ८४,८१६/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पूजा बा. गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर ग्रामीण यांना गोपनिय बातमीदार द्वारे खात्रीलायक खबर मिळाली की, पो. स्टे. वेला गावातील साई नगर, वार्ड क्र. ०१ मध्ये सचिन गवते नावाचा ईसम आपले जनरल स्टोर्सचे दूकाणातून प्रतिबंधीत सुगंधीत तंवाखूची विक्री करीत आहे.
सदर माहीतीची गोपनियता पाळून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर ग्रामीण यांनी उपविभागीय पोलीस कार्यालयातील पोलीस अंमलदार व नागपूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथील पोलीस अंमलदारांचे विशेष पथक तयार करून त्यांनी स्वतः हजर राहून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची विक्री करणारा इसम नामे सचिन जयवंतराव गवते, वय ३७ वर्षे, रा. वार्ड क्र. ०१, साईनगर, बेला, ता. उमरेड, जि. नागपूर याचे जनरल स्टोर्स ने दूकाणाची व त्याचे दूकानाचे मागे असलेल्या राहते घराची झडती घेतली.
घरझडती दरम्याण वेगवेगळ्या एकूण १७ प्रकारचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू मिळून आला. मिळून आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८४,८१६/-रू. इतकी आहे. सदर प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूचा मुद्देमाल व आरोपी सचिन जयवंतराव गवते, वय ३७ वर्षे, रा. वार्ड क्र. ०१ साईनगर, बेला, ता. उमरेड, जि. नागपूर यास ताब्यात घेवून कारवाईची माहीती अन्न व औषध प्रशासन विभाग, नागपूर यांना देण्यात आली.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोशार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पूजा था. गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर ग्रामीण यांनी स्वतः हजर राहून त्यांचे नेतृत्वात पोहवा अरून जयसिंगपूरे, मपोहवा शुभांगी रंगारी, पोना रोशन बावणे, पो.अंम. पांडूरंग मुंडे, पो. अंम, विशाल डेरकर यांनी केली.