नागपूर समाचार : राज्य सरकार आणि स्थानिक प्रशानाकडून होणाऱ्या अत्याचार व छळाच्या विरोधात नागपुरातील जेष्ठ नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर आज नागपूरच्या संविधान चौकात जेष्ठ नागरिकांनी निदर्शने करून लक्ष वेधले.ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व्हावे, वृद्धापकाळ चांगला जावा, शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, याकरिताकेंद्र व राज्य सरकारकडून सुचना प्रसारित केल्या.
२०१३ मध्ये भगतसिंग कोशियारी समितीने मान्य केलेली ईपीएस ९५ पेंशन वाढ व महागाई भत्ता दिलेला नाही. ज्येष्ठांची रेल्वे प्रवास सवलत बंद केली, नासुप्र, मनपा व ३३ पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला नाही, या गोष्टींकडे जेष्ठांनी लक्ष वेधले.
ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांना भेटीकरीता २ ते ३ तास ताटकळत ठेवणे, प्राधान्य असलेल्या सोयी सुविधा न देणे, प्रश्न रेंगाळत ठेवणे, ठराविक वेळेत निर्णय न घेणे या तक्रारी घेऊन नागरिकांनी आज हातात फलक घेऊन आंदोलन केले.