- Breaking News, क्राईम खबर , नागपुर पुलिस, नागपुर समाचार

रामटेक समाचार : जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई

रामटेक समाचार :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय रामटेक विभाग येथील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालणेकरिता स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना शिरपुर फाटा ता. रामटेक येथे अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने रामटेक येथील शिरपुर फाटा येथे नाकाबंदी करून, वाहने तपासत असताना एक आयसर क्र. MH-40-CT- 0571 हे वाहन येतांना दिसले. त्यास थांबून सदर वाहनाची पाहणी केली असता आयसर क्र. MH-40-CT-0571 मध्ये एकुण १६ नग बैल व गोरे अत्यंत निर्दयतेने कोवून, आखूड दोरखंडाने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आल्याने आरोपींच्या ताब्यातून एकुण १६ नग बैल व गोरे किंमती १,६०,०००/-रू. व आयसर क्र. एम एच ४०/ सिटी ०५७१ किंमती १०,०००००/- व असा एकुण ११,६०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी चालक १) तुलसीदास तुलाराम भलावी वय ३५ वर्ष, रा. बिसारपुर ता कुरई जि. शिवनी म. प्र. कंडक्टर २) बशीर वल्द अब्दुल अजीज कुरेशी रा. शिवाजी चौक पिवळी नदी नागपुर ३) मोहम्मद शफीक कुरेशी रा. नागपुर फरार यांचेविरुद्ध कलम ११(११) (d) (e) (f) प्रा. छळ, प्रति. का. सहकलम ५.A(१) म. प. स. अधि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपी क्र. ०१) व २) यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक रमेश बरकते यांचे मार्गदर्शनाखाली पोशि सचिन गेडाम, नापोशि अनिल सपाटे, चालक नितेश उपरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *