- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा; बावनकुळेंचा रामटेक लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

रामटेक, उमरेड, हिंगणा येथे पदाधिकाऱ्यांशी बैठक 

नागपुर समाचार : रामटेक लोकसभा क्षेत्रातील रामटेक सह उमरेड व हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करावी तसेच भाजपा महायुती उमेदवाराला विजयी करण्यासाठी बूथ लेवल पर्यंत काम करावे, असे आवाहन केले.

सोमवारी सकाळी रामटेक येथे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला; त्यानंतर दुपारी उमरेड येथील पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सायंकाळी वानाडोंगरी येथील वायसीसीई कॉलेज परिसरात हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

श्री बावनकुळे यांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचा आढावा घेताना गेल्या चुकांना विसरून नव्याने काम करण्याच्या सूचना केल्या. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बूथ पातळीवरून कामाला सुरुवात करावी. बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स आणि शक्तीकेंद्रप्रमुखांनी भाजपाचे विचार व भाजपा सरकारांची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवावी. नव मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. गहाळ झालेली मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत यावी यासाठी पुढाकार घ्यावा. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करून भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे. उमेदवार कुणीही असला तरी देखील तो महायुतीचा घटक असल्याने त्यास विजयी करण्याची जबाबदारी उचलावी असे आवाहन केले. या आढावा बैठकीतून प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या त्यांच्याशी संवाद साधत संघटनात्मक मार्गदर्शन केले. 

यावेळी भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे, माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, मल्लिकार्जुन रेड्डी, अरविंद गजभिये, अनिल निधान, रिंकेश चवरे, आदर्श पटले, अविनाश खडतकर, उदयसिंग यादव, संजय मुलमुले, सुधाकर मेंगर, दिलीप देशमुख, राहुल किरपान, योगेश वाडीभस्मे, अतुल हजारे, आशिष फुटाणे, इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *