- Breaking News, आंदोलन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘नीट’ परीक्षा घोटाळा, आम आदमी पार्टी आक्रमक

नागपूर समाचार :- देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा प्रश्नपत्रिका गोंधळावर आम आदमी पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. या घोटाळ्या विरोधात आम आदमी पार्टीने गांधी पुतळा चौक सीताबर्डी व्हरायटी स्क्वेअर ला निषेध निदर्शने केली.यावेळी प्रामुख्याने भूषण ढाकुळकर राज्य संघटनमंत्री, सोनू फटिंग राज्य सचिव, अजिंक्य कळंबे नागपूर शहराध्यक्ष, रोशन डोंगरे संघटन मंत्री नागपूर शहर, अरुणज्योती कान्हेरे नागपूर महासचिव, अमेय नारनवरे नागपूर महासचिव,संगीता बाथो उपाध्यक्ष नागपूर ,नामदेव कांबडी नागपूर उपाध्यक्ष,गिरीष तितरमारे सह संघटनमंत्री, सचिन वाघाडे शहर सचिव उपस्थित होते.

नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून देशभर विद्यार्थी आणि पालक संतप्त आहेत. या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. या संदर्भात केंद्र शासनाने स्पष्ट भूमिका घेण्याचे का टाळले? यामध्ये सत्ताधारी पक्षाला काय रस आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. असे प्रदेश संघटन सचिव भूषण ढाकूळकर यांनी म्हटले.

देशभरात नीट परीक्षा घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. विद्यार्थांना,पालकांना दिवसरात्र मेहनत करून निराशा मिळाली आहे.

भारतीय जनता पार्टी ने देशभर मोठा घोटाळा घडवुन आणला आहे, घोटाळ्यातील अनेक जण गुजरात भाजप चे पदाधिकारी आहेत.या संदर्भात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे बुधवारी यांनी निषेध निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विषयावर बोलावे आणि कार्यवाही करावी.केंद्र शासनाचा या परीक्षेची थेट संबंध आहे. आम आदमी पार्टी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. तरीही संबंधित यंत्रणा खुलासा करण्यासाठी पुढे आलेली नाही. अशी तक्रार यावेळी करण्यात आली.

‘नीट’ पेपर लीकवर चुप्पी माफियांसाठी? शिक्षणमंत्र्यांच्या गुळगुळीत भूमिकेवर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे आम आदमी पार्टी यांना शंका यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

उत्तर वगळल्यास या परीक्षेत चार गुण कमी होतात. चुकीचे उत्तर दिल्यास पाच गुण कमी होतात. अशा स्थितीत 718 आणि 719 गुण मिळणे शक्य आहे काय? असा प्रश्न सचिन रामकृष्णराव वाघाडे शहर सचिव आम आदमी पार्टी यांनी केला.

हरियाणातील एका केंद्रावर सात विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. प्रतिवर्षी या परीक्षेत 100 टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी असतात. मात्र यंदा 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यात निश्चितच घोटाळा झाल्याचा संशय येतो.

‘नीट परीक्षेचे निष्पक्षपणा धोक्यात आला असून ; अभ्यासू विद्यार्थीवर हा अन्याय आहे’. असे असून आम आदमी पार्टी याचा तीव्र निषेध करत आहेत.

याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी यावेळी आम आदमी पार्टी नागपूर शहराच्या वतीने करण्यात आली. यावेळी सुषमा कांबडे,विनोद गौर, प्रदीप पवनीकर, पुष्पा डाबारे, स्वप्नील सोमकुवर, तेजराम शाहू, शैलेश बोरकर, प्रतीक बावनकर, शैलेश गजभिये, एल.के.सिंग, चंद्रशेखर पराड, हरीश वेळेकर, बालू बनसोड, जोय बांगडकर, विशाल वैद्य, शुभम सहारे, किशन निमजे, मंजू पोपरे, निलम नारनवरे, प्रशांत अहिरवार, विनोद काकडे, मोहन मंगर, रिहाना शेख, शाहिस्ते शेख, सिमरन नाज, हलिदा बेगम, फॅमिदा बेगम, गौरव सव्वा लाखे, ज्योती खडसे, सीमा कामळे, सलीम शेख, सतीश मेश्राम,सचिन सोमकुवर आणि शेकडो पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *