आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. २५ रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील वाघोली येथील असंख्य पुरुष कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २५ जून २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने संदीप भट, अभय अवचट, विनोद महाकाळकर, रामकरण झाडे, संजय येनोरकर, शंकर तळवेकर, सुनील येनोरकर, मंगेश ढगे, मनोहर डेंगळे, साहेबराव येनोरकर, प्रवीण ढगे, समीर येनोरकर, रवी येनोरकर, मंगेश गहूकर , सचिन महाकाळकर, रोशन खोडनकर, सतीश वरभे, सचिन मुंडे, हर्षल महाकाळकर, गजानन पर्बत, मनोहर अवचट, अनिल नौवकरकर, जिगर वाटमोडे, बालू तळवेकर, संजय बेले, राजू गहूकर, मनोहर अवचट ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह जिल्हा महामंत्री भाजपा आकाश पोहाणे, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, अमोल त्रिपाठी, प्रमोद नौकरकर, कमलाकर महाकाळकर, विजय तळवेकर, राजू गहूकर, राहुल माहुरे, संदीप भट इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.