नागपूर समाचार : आता अंत पाहू नका अंबाझरी उद्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचे निर्माण त्वरित करा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करा आमदारांनी मुंगगिळून बसू नका नाही तर त्यांना साकडे घालण्यात येईल मग ते काँग्रेस,भाजपा चे आमदार असो यांच्या विचार करणार नाही असे रोखठोक मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोर्चाच्या धंतोली येथील यशवंत स्टेडियम कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष राजु पांजरे हे होते तर प्रमुख वक्ते डॉ चरणदास जनबंधू, साहित्यीक तन्हा नागपूरी, मोर्चाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश कपूर, अमरावती शहर अध्यक्ष राहुल रामटेके, रिपब्लिकन जेष्ठ नेते सुखदेव मेश्राम, मुस्लिम मोर्चा चे अध्यक्ष राशिद अली, सुधाकर टवळे, चरणदास गायकवाड,अजय मून, डॉ सुधा जनबंधू, संगिता चांदेकर, संगीता चंद्रिकापूरे, मातंग मोर्चा चे अध्यक्ष मनोहर इंगोले,शांता बशी, होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन चरणदास गायकवाड यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.