- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपूर विमानतळ रनवे दुरुस्ती सप्टेंबरपासून

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विनंतीची दखल

नागपुर समाचार : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाईपट्टीचे री-कार्पेट कामाला सप्टेंबर महिन्यात सुरुवात करून हिवाळ्यात पूर्ण होईल. विशेष म्हणजे, हवाईपट्टी रि-कार्पेट करण्याचे काम पावसाळ्यानंतर करण्यात यावे, अशी विनंती भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहानच्या अधिकाऱ्यांना केली होती. 

१६ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत विमानतळ प्राधिकरण तसेच कंत्राटदार कंपनीने विमानतळाच्या रनवे रि-कार्पेटिंग कामाबाबत चर्चा करून हिवाळ्यात हे काम करण्याचे ठरविले आहे. याबाबत आवश्यक असणाऱ्या सुरक्षात्मक कार्यवाही केली जात आहेत. मिहान इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळाच्या हवाईपट्टी दुरुस्तीसाठी १९ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती.

त्यावेळी विमानतळाच्या हवाईपट्टी रि-कार्पेट करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम २०२४ च्या उन्हाळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती विमान वाहतूक कंपन्यांना दिली होती. त्यानुसार विमान कंपन्यानी देखील काही सूचना केल्या होत्या. त्यानंतर, एप्रिल २०२४ मध्ये हवाईपट्टीच्या दुरुस्तीकामाला सुरुवात झाली, तथापि काही कारणास्तव कामाला उशीर झाला. 

पावसाळ्यात दुरुस्तीचे काम शक्य नसल्याने नंतर काम सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला. त्यामुळे १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत विमान कंपन्या आपले परिचालन सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. १५ सप्टेंबर २०२४ पासून नागपूर विमानतळाच्या हवाईपट्टीच्या दुरुस्ती काम सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यक असणाऱ्या काही प्रक्रियांची मंजुरी घेतली जात आहे. विमानतळाच्या कामाबाबत श्री बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने प्रवाशी व विमान वाहतूक कंपन्यांच्या अडचणी सुटल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *