- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजने चे स्वागत उत्स्फूर्तपणे साजरे..

भाजपा विभागीय कार्यालय धंतोली येथे भाजपा महिला मोर्चा कडून उत्स्फूर्तपणे जल्लोष करण्यात आला

नागपुर समाचार : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायूती सरकार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अमलात आणला. यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना’ मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे.

या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय. मा. उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी अंतरिम अर्थ संकल्पात लाडकी बहीण योजना सुरू केली, या संदर्भात विभागीय कार्यालय धंतोली येथे भाजपा महिला मोर्चा कडून जल्लोष साजरा करण्यात आला.

महिला मोर्चा पालक श्री. रामभाऊ आंबुलकर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. प्रगती ताई पाटील माजी महापौर नंदाताई जिचकार महामंत्री सौ. मनिषा काशीकर,सौ. सारीका नांदूरकर,सौ. प्रिति राजदेरकर,सौ. सुषमा चौधरी,सौ. निकिता पराये , सौ श्रद्धा पाठक सौ.ज्योती देवघरे ,सौ.कविता इंगळे महामंत्री संध्या चतुर्वेदी, सोशल मीडिया सहसंयोजिका रूपल दोडके यांच्या उपस्थितीत जल्लोष उत्स्फूर्तिने साजरा करण्यात आला सर्व शहर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व महामंत्री, संपर्क प्रमुख, मंडळ पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *