- Breaking News, Meeting, आयोजन, नागपुर पुलिस, नागपुर समाचार

नागपुर समाचार : दादासाहेब बालपांडे कॉलेज येथे बेलतरोडी पोलीस स्टेशन द्वारे “नवीन कायदा जनजागृती अभियान” चर्चासत्रचे आयोजन

नागपूर समाचार : सोमवारी १जुलै रोजी सकाळी १२:३० वा. ते १३:३० वाजेपर्यंत दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर येथे विजयकांत सागर, पोलीस उपआयुक्त, परीमंडल क्र. 4 नागपूर शहर यांचे प्रमुख मार्गदर्शनात नवीन कायदा संबंधाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

चर्चासत्रात बेलतरोडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे साहेब, ॲड. विजेता कांबळे, समाज सेविका व शांतता समिती सदस्य आणि महिला दक्षता समिती सदस्य व प्रतिष्ठित नागरिक, माजी नगरसेवक, यांचेसह परिसरातील १०० ते १२५ महिला/पुरुष व कॉलेज चे विद्यार्थी हजर होते.

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायद्याबद्दल जनजागृती अभियान सुरू केले आहे. सदर चर्चासत्र मध्ये या अभियानाचा उद्देश नागरिकांना नव्या कायद्याबाबत माहिती देणे व त्याचे महत्त्व पटवून देणे असा होता. विजयकांत सागर, पोलिस उपयुक्त, नागपूर, आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी या अभियानाच्या उद्घाटनावेळी सांगितले की, “या कायद्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल आणि न्यायव्यवस्थेचा कार्यक्षमतेने वापर होईल.” यावेळी पोलिस उपनिरीक्षक अविनाश कराड, यांनी नागरिकांना आवाहन केले की, “नव्या कायद्याचे पालन करून आपण सुरक्षित आणि शांत समाज निर्माण करूया.”

सदर कार्यक्रमात सर्व उपस्थिथांना नवीन कायदा संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच त्यांचे शंकेचे निराकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम अंबे दुर्गा एज्युकेशन सोसायटी नागपूर चे अध्यक्ष मनोज बालपांडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्ज्वला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे संचालन व आभार आयक्यूएसी चे समन्वयक डॉ.अजय पिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन मेंढी, रोहिणी खरवडे, कृतिका सावरकर, अपूर्वा तिवारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *