- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : महिलांकडुन लाडकी बहिण योजनेला घेऊन ‘आमचा लाडका भाऊ देवेंद्र’ म्हणुन फडणवींसांचे स्वागत

नागपूर समाचार :- आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असतांना नागपूर विमानतळावर फार मोठ्या प्रमाणात “आमचा लाडका भाऊ देवेंद्र” असे फलक हाती घेऊन दमदार स्वागत केलं. “आमची लाडकी बहिण” ह्या योजनेची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आले होते.

यावेळी फार मोठ्या प्रमाणावर सामान्य जनता उपस्थित होती. सामान्य महिला देखील उपस्तिथ होत्या. लाडकी बहीण योजना ज्यामुळे निराधार आणि अविवाहित महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. एका भावाने पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्या बहिणीसाठी केलेला हा विचार नक्कीच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे, त्याचेच धन्यवाद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या .

यावेळी प्रामुख्याने रितेश गावंडे, वर्षा चौधरी, शिवाणी दाणी, आसावरी कोठीवान, मंजुषा भुरे ह्यांच्यासह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच भाजप कडून नितीन महाजन, सुनीत सोंडवले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *