- Breaking News, Meeting, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : शहरातील पूरपरिस्थिती नियंत्रण संदर्भात मनपात कार्यशाळा

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व श्री अजय चारठणकर यांच्या प्रमुख उपस्थिती “पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” (Geospatial Analysis of Flood Risk and Heat Wave) या विषयावर मंगळवारी (ता.९) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मनपा आयुक्त यांनी पूर पूर्व चेतावनी प्रणाली स्थापन करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. या मुळे नागरिकांना पूर बद्ल योग्य माहिती वेळेपूर्वी देता येईल. सध्या देशातील काही शहरांमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात नागपूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उत्पन्न होणारी पूर परिस्थिती तसेच उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यशाळेत यूएनडीपीच्या मार्गदर्शनाखाली अल्यूव्हियम इंटरनॅशनल व अल्यूव्हियम कंस्लटेंसी इंडिया यांच्याद्वारे आभासीपद्धतीने सादरीकरण करीत चर्चासत्र घेण्यात आले.

याप्रसंगी मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, साथरोग अधिकारी डॉ, गोवर्धन नवखरे, नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, मनपाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे यूएनडीपीच्या शहर समन्वयक श्रीमती आरुषा आनंद, यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व अल्यूव्हियमचे श्री. पार्थ गोयल, श्री. आकाश मलिक, श्रीमती जाला अलोरा आभासीपद्धतीने उपस्थित होते.

कार्यशाळेला मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम शहरातील नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारणे तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *