नागपूर समाचार : बुलढाणा जिल्हा नागरीक मंडळ, नागपूर आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, नागपूर यांच्या विद्यमानाने भारत सरकारच्या केंद्रिय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल प्रतापराव जाधव यांचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा २० जुलै २०२४ ला, सायंकाळी ५ वाजता जवाहर वसतिगृह सिव्हिल लाइन, नागपूर येथे केंद्रिय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजयजी संचेती माजी खासदार राहणार आहे. कार्यक्रमात प्रमूख अतिथी च्या स्वरूपात मा. सौ. श्वेताताई महाले आमदार, चिखली विधान सभा, श्री राधेश्यामजी चांडक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन परीवार हे उपस्थीत राहणार आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमात उपस्थीत राहण्याची विनंती बुलढाणा जिल्हा नागरीक मंडळ, नागपूर आणि नेशनल मेडीकल एसोसिएशन, नागपूर द्वारे करण्यात आली आहे.