परमात्मा एक : “एक चित्त, एक लक्ष, एक भगवान” हे बाबा जुमदेवाजींचे माझ्या वडीलांचे शब्द आहेत. या साध्या शब्दात मार्ग देण्याचा संपूर्ण उद्देश व्यक्त झालेला आहे. एक चित्त, एक लक्ष करण्याकरीता बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. शिस्त आणि त्याग यांचे पालन करावे लागते. साधे कार्य आणि त्यागाचे कार्य देण्याचा हाच अर्थ असतो की आपले लक्ष एकाच परमेश्वराकडे लागले पाहिजे आणित्या परमेश्वराची जाणीव झाली पाहीजे.
बाबा नेहमी म्हणायचे की ही कृपा जागृत आहे, या कृपेला शब्द देणे ही फार मोठी गोष्ट आहे. आपण खास परमेश्वरालाच शब्द देत आहो ही जागृती झाली पाहीजे. याच परमेश्वरानी विचार शक्ती पण दिलेली आहे. कार्य देतांनो किंवा कार्य घेतांना विचार करूनच पाऊल पुढे टाकावे, भिती ठेवून किंवा अंधश्रद्धा बाळगून नव्हे, परमेश्वराची आत्मप्रचिती ज्यांना होते त्यांना जीवन धन्य झाल्यासारखे होते.
त्यांच्या स्वभावात आणि वागणूकीत फरक होतो. मानव धर्माविषयी त्यांची जागृती होते आणि ते मानव धर्माच्या कार्याला लागतात. या जगात बरेच लोक आहेत ते परमेश्वराला आपआपल्या परीने मानतात. आपल्या मार्गात परमेश्वर एका विशेष तन्हेनी प्रगट झालेला आहे आणि आपल्याला एका विशेष तन्हेनी संदेश देत आहे. आपल्याला मिळत असलेला संदेश जेव्हा आपण घेवून चालू तेव्हाच आपली प्रगती जास्त होणार आहे. या मार्गावर आलेले सेवक कुटुंबामध्ये प्रेम ठेवतात. कोणाला दुःख देत नाही. कोणावर अन्याय करत नाही. सेवकांना जीवनात सुख आणि समाधान मिळालेले आहे, तसेच या नियमावलीला स्विकार करणाऱ्या सेवकांना परमेश्वरी आत्मप्रचिती मिळेल आणि सुख समाधान मिळेल हे बाबा जुमदेवर्जीचे शब्द लक्षात आणून मी ही प्रस्तावना लिहीली आहे. वाचणाऱ्यांना माझे प्रेम, शुभेच्छा आणि नमस्कार.