कोराडी/नागपूर समाचार : “रियल क्रिएटिव्ह आर्ट फाउंडेशन” द्वारे श्रावण सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला. श्रावण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षिका सौ रंजना शिंगाडे आणि उपाध्यक्ष विद्या लंगडे यांनी केले असून हा कार्यक्रम रोकडे ज्वेलर्स कोराडी इथे असलेला शोरूम मध्ये घेण्यात आला.
“श्रावण मास ” या महिन्याचे महत्व काय असते आणि या संबंधित आपली संस्कृती काय आहे आणि महिला वर्ग तो मोठ्या उत्साहाने का साजरा करतातयामागील काय भावना असते व निसर्ग आपल्याला कशी साथ देते याचे महत्त्व कार्यक्रमात येणाऱ्या महिलांना समजावून सांगण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या अभिनेत्री विजया शिंदे यांनी श्रावण मासाचे महत्त्व समजून सांगितले कार्यक्रमाचे संचालन विद्या ‘लंगडे यांनी केले होते.
या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश असून महिलासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक महिलांना भेटवस्तू देण्यात आला व विजेत्यांना बक्षीस देण्यात आले महिलांनी कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता कार्यक्रमाचे आभारव्यक्त संगीता कोसरे यांनी केले व कार्यक्रमाचे समापन करण्यात आले