नागपूर समाचार :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शंकरनगर परिसराची पाहणी करीत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार विकास ठाकरे व भागातील नागरिक उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी धरमपेठ झोनच्या अधिकार्यांसोबत इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्याच्या बाभुळकर मार्गाचा दौरा केला आणि नाग नदीच्या काठावर असलेले झोपडे तत्काळ हटविणायचे निर्देश दिले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्यानची पाहणी केली.
यावेळी आयुक्त चौधरी यांनी नाग नदीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या झोपडे हटविण्याचे निर्देश दिले. याशिवाय तुटलेली सीवर लाइन तात्काळ दुरुस्त करून पुलाची दुरूस्ती करावी, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या कापाव्यात आदी निर्देशित केले.
याप्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, कनिष्ठ अभियंता मनोहर राठोड उपस्थित होते.