विधानसभा निहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद
नागपूर/भंडारा/गोंदिया समाचसार : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवार दि. २४ व गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते दोन्ही जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील.
भंडारा-गोंदिया जिल्हा प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत जिल्हा व लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
• बुधवार दि. २४ रोजी सकाळी १० वा. भंडारा येथील पोलिस बहुउद्देशीय सभागृहात भंडारा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी १ वा. तुमसर येथील दीनानाथ मंगल कार्यालयात तुमसर विधानसभा तर दुपारी ४ वा. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील ड्रिम गार्डन लॉन येथे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
• गुरुवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ वा. गोंदिया येथील विशाल लॉन्स येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील, दुपारी १ वा. सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन्स येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील तर दुपारी ४ वा. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भारत सभागृह येथे साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार परिणय फुके, भंडाराचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष अॅड. यशूलाल उपराडे, माजी खासदार सुनील मेंढे, आ. विजय रहांगडाले, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार पडोळे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, विजय शिवनकर, प्रदीप पडोळे, अनूप ढोके, बाळाभाऊ काशिवार, शिशुपाल पटले, कल्याणीताई भुरे, निशिकांत इलमे, अमित झा, डॉ. शालिनी डोंगरे, सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी करीत आहेत.