- Chif editor - Wasudeo Potbhare

परमात्मा एक : काय आहे परमात्मा एक मानव धर्म ?

।भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम।

।।महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम।।

।।।परमात्मा एक।।।

परमात्मा एक : नागपुर गोळीबार चौक, टिमकी येथे अत्यंत गरीब कुटुंबात बाबा जुमदेवजी यांचे जन्म झाले झाले. त्यांचे आणि त्यांचे परिवार हे अत्यन्त वाईट, दुःखी, अनेक दुःखाने ग्रासलेले होते, अतिशय वाईट स्थितीत त्यांच परिवार जीवन जगत होता. अशात्याच एका सन्यासाद्वारे बाबा जुमदेवजींना भगवंत प्राप्तीचा विधी मिळाला. बाबांनी त्या विधी एका भगवंताची प्राप्ती केली. त्या मुळे त्यांचा वरील आणि त्यांच्या परिवा रातील दुःख दूर झालेत. बाबांनी विचार केला की त्यांचा सारखे कितीतरी लोक विविध रोगांनी, अनेक प्रकारच्या त्रासानी, अंधश्रद्धेनी ग्रासलेली आहेत, त्यामुळे त्यांचे पण दुःख दुर व्हावे म्हणून त्यांनी १९४९ ला परमात्मा एक, मानव धर्माची स्थापना केली. मार्गाचे प्रचार आणि प्रसार व्हावे या करीता त्यांनी अहोरात्र परिश्रम केलेत. 

गावो गावी, पायदळ, बैलबंडीने जाऊन मार्गाचा प्रचार प्रसार केला, दुःखी कष्टी लोकांना भगवंत प्राप्तीचा मार्ग दिला. अनेक लोकांनी या मार्गाचे अवलंबन करून आपले जीवन सुखमय केलेलं आहे. आज आपण बघतो की गावो गावी, खेडो पाडी, शहरा शहरात, राज्या राज्यात, देशात या मार्गाचे सेवक पहायला मिळतात, ज्यांचा घरावर कृपया दारू पिऊन आत येवू नये अशी पाटी लिहलेली असते.

बाबांनी सेवकांना काही तत्व शब्द नियम सांगितलं आहे त्यात दारू, सट्टा, जुगार, लॉटरी, चोरी करने, खोटे बोलू नये अशे बरेच वाईट व्यसन परीपूर्ण बंद करायला लावले आहेत. बाबांचे असे म्हणने आहे की जर का माझा सेवक हा या नियमांचा तंतोतंत पालन करेल तर तो कधीही दुःखी राहूच शकत नाही. ज्या माणसाचे दुःख कुठेच दुर होत नाही ते लोक हा मार्ग स्वीकारतात आणि सुखी होतात.

बाबांनी कधीही कुणाला स्वतःचे पाया पडू दिले नाही. कुणाकडून कधीही पैशे घेतले नाही, कुणा कडून व्यक्तीगत हार स्वीकारला नाही. बाबांनी अतिशय त्यागी जीवन जगून मानव जागृती चे कार्य केले. परम आत्मा एक, मानवाने मानवा सारखे जगावे या तत्वावर त्यांनी मानव धर्माची स्थापना केली. बाबांचे त्याग पाहून सेवकांनी बाबांना महानत्यागी ही पदवी बहाल केली. तेव्हा पासून सेवक बाबांना महान त्यागी बाबा जुमदेवजी म्हणू लागलेत. बाबांनी हिंदू धर्मात एक आदर्श असा परमात्मा एक मार्गाची ओळख सेवाकांना करून दिली. 

बाबांनी सेवकांना मूर्ती पूजेचे त्याग करून हर आत्मत परमात्मा ची ओळख करून दिली, आणि साक्ष्यात भगवंताची अनुभती सेवकांना करून दिलेली आहे. भगवंताचे अनुभव मिळवून दिले आहे. या मार्गात लोकांचे कोणत्याही प्रकारचे, अशक्य असे दुःख, विमाऱ्या, अंधश्रद्धा, मोठाले रोग जसे की कॅन्सर, टीबी, एड्स, कोळ, भूत बाधेचे प्रकार अशे विविध प्रकारचे अशक्य असे दुःख दूर झाल्याचे अनुभव सेवक सांगत असतात. 

या मार्गात सेवकांचे दुःखच दुर होत नाही तर त्यांचात एक विशेष बदल झालेल पहायला मिळतो. तो प्रगती पथका कडे वाटचाल केलेला दिसतो. जे काम शासनाला जमले नाही ते काम महानत्यागी बाबा जुमदेवजिंनी केले आहे. एक असा समाज निर्माण केलेला आहे जो वाईट व्यसन करत नाही, सत्याच्या मार्गावर चालतो. या मागांत कुठेही पैश्याची देवाण घेवान होत नाही, मार्गाशी जुळण्याकरीता कुणाला परावृत्त केल्या जात नाही.

पण कुणी कोणत्याही दुःखाने ग्रासला असेल आणि कोणत्याही मागनि जर त्यांचे दुःखाचे निवारण जर होत नसेल तर या मार्गाचे एकदा अनुभव घेऊन पहा असे सेवक लोक सांगत असतात. या मार्गाचे प्रचार आणि प्रसार व्हावे, दुःखी कष्टी लोकांना सुखी जीवनाचे मार्ग मिळावे म्हणून गावा गावात मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे मार्गदर्शक निष्काम भावनेनी सेवकांना शब्द रूपी मार्ग देतात. 

या मार्गात आल्यावर दुःखीतांचे दुःखच दुर होत नाही तर त्यांच्या जीवनाचे काया पालट झालेले आपणांस दिसून येते. आता तर पूर्ण गावचे गाव या मार्गाचे अवलंबन करत आहेत असे पहायला मिळत आहे, म्हणजे एक निरव्यसनी समाज देशात उदयास आलेले आहे आणि आणखी येणार आहेत. कारण सेवक म्हणतो ज्या कोणत्याही दुःखाचे निवारण देशात नाही त्या दुःखाचे निवारण आमच्या परमात्मा एक मार्गात होईलच म्हणून दिवसेंदिवस या मार्गातील सेवकांची संख्या वाढत आहे असे आपणांस पहायला मिळते. 

महान त्यागी बाबांचे त्याग आणि लोक कल्याण कारी कार्य पाहून शासनाने वावांच्या नावाची पोस्ट तिकिट जाहीर केलेली आहे. देशात ३ एप्रिल हा दिवस सारे सेवक मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. अश्या या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्म उत्सवा निमित्त सर्व परमात्मा एक सेवकांना कोटी कोटी शुभेच्छा.

सर्व सेवक आणि सेविकांना नमस्कार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *