- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपुर समाचार : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’ चे लोकार्पण संपन्न

भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळेनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर समाचार : श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’चे आज बुधवारी 24 जुलै रोजी सकाळी ठिक 7.45 वाजता लोकार्पण लोकार्पण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदरशेखर बावनकुळे यांनी केले. सिव्हिल लाईन्स येथील ‘रामगिरी’ येथे भारतीय जनता पक्षाचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळेनी ‘फिरता दवाखाना’ला हिरवी झेंडी दाखविली.

विविध भागांमध्ये जाऊन गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’ची सेवा श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारे सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी महापौर, श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संदीप जोशी यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *