नागपूर समाचार : महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मोफ़त आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी महावितरण आणि व्होकार्ट हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा-आरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते (दि. 23 जुलै) विद्युत भवन येथे करण्यात आले.
प्रत्येक कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन यावेली बोलतांना दिलीप दोडके यांनी केले. या शिबिराच्या अनुषंगाने महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी महावितरण कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पोट आणि यकृत, मेंदू आणि पाठीचा कणा, हृदय आणि मुत्रविकार यासंदर्भातील आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय चाचण्यांचे आयोजन महावितरणच्या बिजली नगर येथील अतिथी गृहात करण्यात येणार आहे. या शिबिराची सुरुवात (दि. 23 जुलै) 50 कर्मचा-यांच्या कोलेस्ट्रॉल चाचणीने करण्यात आली, या शिबिरात निशुल्क ई.सी.जी. ब्लड शुगर चाचणी व आरोग्य तपासणी, रक्तासबंधी विविध आजारांवर तज्ञ महिला डॉक्टरांकडून महिलांना मार्गदर्शन, फायब्रोस्कॅन (यकृताच्या आरोग्याचे विश्लेषण) आदी विषयांवर मार्गदर्शन आणि विविध प्राकारच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
यावेळी व्होकार्ट हॉस्पीटलचे डॉ. पियुष मारुडवार, डॉ. अमेय बिडकर, डॉ. श्रीकांत जय, व्होक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरचे सेंटर हेड रवी बगाली, मार्केटींग प्रमुख जितेंद्र झाडे, कार्पोरेट मार्केटींगचे राजेश सेलोकर यांचेसह महावितरणचे अधीक्षक अभियंते राजेश नाईक, मंगेश वैद्य, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रांजली कोलारकर व प्रदिप सातपुते, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, प्रणाली विश्लेषक श्री प्रविण काटोले यांच्यासह अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या स्म्ख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अमित पेढेकर यांनी केले. यावेळी व्होकार्ट हॉस्पीटलचे मयुर टुले, समीक्षा शेंडे आणि संदीप या कर्मचा-यांनी कर्मचा-यांच्या तपासणित सहभाग घेतला.