- Breaking News, विदर्भ

गडचिरोली समाचार : गडचिरोली पोलीस शिपाई भरती २०२२-२३ (प्रत्यक्ष भरती- २०२४) लेखी परीक्षा संबंधीत सुचना

२८ जुलै रोजी गडचिरोली शहरातील ११ परिक्षा केंद्रावर होणार लेखी परिक्षा

गडचिरोली समाचार : गडचिरोली पोलीस दलातर्फे ९१२ पोलीस शिपाई पदासंबंधीत मैदानी परीक्षा ही दिनांक २१/०६/२०२४ ते १३/०७/२०२४ रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती. मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण ६७११ उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक २८/०७/२०२४ रोजीचे सकाळी ०८.०० वा. आयोजीत करण्यात आलेली आहे. यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी १०.३० ते १२.०० या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी १३.३० ते १५.०० वा. दरम्यान घेण्यात येणार आहे.

सदर पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील १) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, २) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), ३) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, ४) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, ५) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, ६) स्कुल ऑफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, ७) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, ८) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, ९) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, १०) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, ११) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकूण ११ केंद्रावर घेण्यात येणार आहे.

तसेच उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी ०८.०० वा. उपस्थित राहणे आवश्यक राहील. सदर पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तरी, सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या लेखी परिक्षेची तारिख तसेच जिल्हायातील पावसाची परिस्थिती लक्षात ठेऊन लेखी

परिक्षेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक कागदपत्रानिशी परिक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे. तसेच सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. सोबतच परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, उमेदवारांसाठी पेन व पेंड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच पेपर क्र.०१ व पेपर क्र.०२ च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये कुणीही बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोबत बाळगणार नाहीत व कोणताही गैरप्रकार करणार नाही. उमेदवाराला सोबत फक्त ओळखपत्र व प्रवेशपत्र घेऊन जाण्याची मुभा राहील. कोणताही उमेदवार गैरप्रकार किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करतांना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *